‘बॉलीवुड’मधल्या संगीतकारांवर नेहमी ‘उचलेगिरी’चा आरोप केला जातो, पण शोधायला गेलं तर दिसतं की, बहुतेक सगळ्याच संगीतकारांनी ती केलेली आहे!
काही संगीतकारांवर उचलेगिरीचा आरोप नेहमी केला जातो, पण शोधायला गेलं तर दिसतं की, बहुतेक सगळ्याच संगीतकारांनी ती केलेली आहे. मला व्यक्तिशः मात्र याला उचलेगिरी किंवा चोरी असं म्हणावंसं वाटत नाही. त्याला आपण फार तर प्रेरणा किंवा बेतलेलं म्हणू शकतो. कारण या संगीतकारांनी त्यांचं इतकं ‘भारतीयकरण’ केलेलं आहे की, त्या चाली मूळच्या ‘भारतीय’च वाटतात. काही वेळा केवळ मुखड्याला या चाली वापरल्या आहेत.......